सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केले ते त्यांनी केले नसून त्यांचे ट्विटर खाते हॅक झाले होते, असे आता सांगितले जात आहे. मात्र याचा पुरावा काय? हा खुलासा अपुरा आणि निराधार वाटतो, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अमित शहांच्या खुलाशावर शंका उपस्थित केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>संतापजनक… अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

त्या आज शनिवारी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, सामान्य माणसाला अपेक्षा आहे की संवेदनशील पद्धतीने हा प्रश्न सोडविला जावा. सीमाभागात जी अविकसित गावे आहेत त्या भागात सर्वांनी मिळून विकास केला पाहिजे. यासोबतच महापुरुषांबाबत चुकीची वक्तव्ये केली जाऊ नयेत. मात्र जे मनात आहे तेच तोंडात येत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश येत असल्यामुळे मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठीही अनकदा असे वक्तव्य हत्यार म्हणून वापरले जातात का, अशीही शंका येत असल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr neelam gorhe raised doubts about amit shah claim bommai twitter account was hacked mmb 82 amy
First published on: 17-12-2022 at 16:57 IST