नागपूर: राष्ट्रपतीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी प्रथमच राज्याची उपराजधानी नागपुरात सायंकाळी हैदराबाद येथून आगमन होणार आहे. आज त्यांचा येथील राजभवनात मुक्काम असून ५ व ६ जुलैला त्यांचे गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आहेत
४ जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती ५जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील.

त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात पहिल्या दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या दालनात १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे६ जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील.

हेही वाचा >>>Samriddhi Bus Accident : समृद्धी दुर्घटनाग्रस्त बसची अपघातानंतर ‘पीयूसी’!; बस जळून खाक, मग तपासणी झाली कशी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वागताला राज्यपाल, मुख्यमंत्री

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.