लोकसत्ता टीम
नागपूर: गो-फर्स्टने दिवाळखोरी जाहीर करून आपली सेवा बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने एयर इंडियाने आणखी एक फ्लाईट सुरू केली आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
एयर इंडियाची ही सेवा २० मे ते २५ जूनपर्यंत केली जात आहे. एयर इंडियाचे फ्लाईट क्रमांक १६१३ मुंबईवरून सकाळी ११ वाजता रवाना होईल आणि नागपुरात दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. तसेच फ्लाईट क्रमांक १६१४ नागपूरवरून दुपारी १२.५५ ला रवाना होईल आणि मुंबईत २.४५ वाजता पोहोचेल. गो-फर्स्टची फ्लाईट्स रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता एयर इंडिया नवीन फ्लाईटची सुरुवात करणार असल्याने त्यांना दिलासा मिळू शकेल.