वर्धा: विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूरच्या यात्रेला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून छोट्या दुकानदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

आर्वीलगत कौंडण्यपूर येथे कार्तिकी एकादशीपासून यात्रेला सुरूवात होते. विदर्भासह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या दिंड्या येतात. आज पहाटेपासून झालेल्या पावसाने यात्रेचा नूरच बदलला. वारकऱ्यांच्या आनंदी आगमनावर पाणी फेरले. निवास व्यवस्थेला फटका बसला. यात्रेच्या निमित्याने विविध वस्तूंची शेकडो दुकाने लागतात. पण पावसाने दुकान झाकून ठेवावे लागले. येथील कच्चा चिवडा भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. चिवड्याची ५० वर दुकाने लागतात. हा कच्चामाल पावसाळी वातावरणाने खराब झाला.

Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
ambulance caught fire in Yavatmal Fortunately four people including a pregnant woman survived
यवतमाळमध्ये धावती रुग्णवाहिका पेटली; गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावले

हेही वाचा… … तर उसाच्या दरात बांबूची विक्री; नितीन गडकरी असे का म्हणाले?

या यात्रेचे अभ्यासक डॉ.श्याम भुतडा यांनी सांगितले की किमान पाचशे पोती मुरमुरे, शंभर पोती फुटाने, पन्नास पोती पोहे चिमून गेले. आज मंगळवारी येथे दहीहंडी आहे. त्यासाठी भाविकांच्या उत्साहाला उधाण येते. पण पावसामुळे कच्च रस्ते खराब झाले असून यात्रास्थळी पोहचण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. या सात दिवस चालणाऱ्या यात्रेच्या पूर्वाधातच पावसाचे आगमन झाल्याने यात्रेतील व्यवसायासाठी आणलेला माल कसा विकला जाणार, याची चिंता व्यावसायिकांना पडली आहे.