नागपूर: २००६ च्या मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेला व अद्याप त्यावर अंमलबजावणी न झाल्याने नागपूर कारागृहात असलेला इहतेशम सिद्दीकी याने त्याच्या विरोधातील आरोपांचा तपास एटीएसने पुन्हा करावा, अशा आशयाचे पत्र एटीएस, पंतप्रधान कार्यालय व कारागृह प्रशासनाला पाठवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर कारागृहातूनच सिद्दकीने वरील पत्रव्यवहार केला. पण कारागृह प्रशासनाने त्याचे पत्र खरच पुढे पाठवले किंवा नाही म्हणून सिदकीने या बाबत विचारणा केली. त्याला कारागृह प्रशासनाने पत्राचा ‘आॉनवर्ड क्रमांक’ दिला. पण सिद्दकीला पत्र पुढे पाठवल्याची प्रत हवी होती. त्यासाठी त्याने माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज कारागृह प्रशासनाकडे दिला. माहिती न मिळाल्याने आयोगाकडे अपील केले. त्यावर माहिती आयुक्तांपुढे सुनावणी झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ehtesham siddiqui write letter demanding reinvestigation in mumbai blast case pbs
First published on: 16-06-2022 at 12:48 IST