नागपूर : मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये एका ६२ वर्षीय रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवूनच व्हेंटिलेटर लावण्यात आला. परंतु याबाबतची माहिती पाच तासापर्यंत डॉक्टरांनी नातेवाईकांना दिलीच नाही. शेवटी नातेवाईकांनी विचारणा केल्यावर डॉक्टरांनी रुग्णाला तपासून तो दगावल्याचे सांगितले.

वसंत इंगळे असे रुग्णाचे नाव आहे. त्यांना शुक्रवारी रात्री नातेवाईकांनी मेडिकलच्या आकस्मिक विभागात आणले होते. येथून ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवले गेले. येथे डॉक्टरांनी रुग्णाला स्ट्रेचरवरच व्हेंटिलेटर लावले. परंतु, नंतर रुग्णाकडे लक्षच न दिल्याने या रुग्णाचा केव्हा मृत्यू झाला, हे त्यांनाच कळले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

हेही वाचा…ताडोबा जंगल सफारी तिकीट घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना सापडत कसे नाही?

दरम्यान, नातेवाईकांनी डॉक्टरांना रुग्णाची स्थिती कशी आहे, असे विचारल्यावर डॉक्टरांनी तपासले असता रुग्णाचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले. रुग्ण दगावला असल्याचे सांगितल्यावर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या कामावर संताप व्यक्त केला. नातेवाईकांच्या माहितीनुसार, उपचारादरम्यान इंगळे यांना ट्रॉमातील वॉर्डात रुग्णशय्या मिळाली नाही. त्यामुळे बाहेर स्ट्रेचरवरच व्हेंटिलेटर लावण्यात आले.

सकाळी ६ ते ७ दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परंतु, दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह स्ट्रेचरवरच पडून होता. कागदोपत्री कार्यवाही करण्यासाठी येथील डॉक्टरांना वेळ मिळाला नाही. नंतर कर्मचाऱ्याच्या मदतीने मृतदेह दुपारी दोन वाजता मेडिकलच्या शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आला. सायंकाळी ६ नंतरही इंगळे मृतदेह नातेवाईकांना मिळाला नाही.

हेही वाचा…“आपल्याला विरोधकांची  मते कमी करायची आहेत आणि….” काय म्हणाले गडकरी?

याबाबत अद्याप कार्यालयाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु, घटनेचे गांभिर्य बघत चौकशी केली जाईल. – डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल हॉस्पिटल