गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे ‘जीमेल’ खाते ‘हॅक’ करून त्यांच्या संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

‘ऑनलाईन’ फसवणुकीच्या प्रकारात सर्वत्र वाढ झालेली असताना भामट्यांनी थेट गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनाच लक्ष्य केल्याने विद्यापीठ वर्तुळात एकच गोंधळ उडाला. भामट्यांनी कुलगुरूंचे ‘जीमेल’ खाते ‘हॅक’ केले. त्यातून संबंधितांचे दूरध्वनी क्रमांक चोरून कुलगुरूंचे छायाचित्र असलेल्या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरून सर्वांना एक ‘लिंक’ पाठविली. त्यात ‘ॲमेझॉन’च्या कूपनसंदर्भात माहिती समाविष्ट करा, अशी विनंती करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बाब लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने एक पत्रक काढून हा प्रकार उघड केला व गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केल्याचे कुलगुरू डॉ. बोकारे यांनी सांगितले.