अतिक्रमण हटवण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर अतिक्रमणधारकांनी हल्ला केला. जमावाने लाठ्या काठ्या, पेट्रोल व कुऱ्हाड घेऊन वनकर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केला. वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले व बिटरक्षक कहुळर यांचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच शासकीय वाहनावर पेट्रोल टाकत दगडफेक केल्याचा गंभीर प्रकार तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा सहवनक्षेत्रातील गोंडी येथे घडला.

हेही वाचा >>>नागपूर : धक्कादायक! नऊ दिवसांच्या ‘नकोशी’चा अडीच लाखांत सौदा

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा सहवनक्षेत्रातील गोंडीटोला येथील गोंडीटोला (सुकळी/नं.) गट क्रं. २३ व ३६ / २ मध्ये १५ ते २० आदिवासी लोकांनी शासकीय जागेवर काही दिवसांपूर्वी अतिक्रण केले होते, त्यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही त्या ठिकाणचे अतिक्रमण सोडले नाही. याउलट ॲट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून ज्या ज्या वेळी वनकर्मचारी अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी गेले, तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना महिला व पुरुषांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वनकर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अतिक्रमणाबाबतीत चार वनगुन्हे जारी केलेले आहे व अतिक्रमणधारक बळजबरी करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

शुक्रवारी, २४ मार्च रोजी बिट रक्षक डी.ए. कहुळकर, क्षेत्र सहाय्यक यू. के. ढोके, बिट रक्षक ए.जे. वासनिक, डी.जे. उईके, वनरक्षक ए.डी. ठवकर व वनमजूर इमारचंद शिवणे सकाळी १०.३० वाजता गस्तीवर असताना त्यांना गोंडीटोला (सुकळी / नं.) गट क्रं. २३ व ३६/ २ मध्ये २० ते २५ व्यक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून धुरे बनवताना आढळून आले. बिट रक्षक कहुळकर यांनी त्यांना ट्रॅक्टर बाहेर काढण्यास सांगितले असता त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा >>>नागपूर : ‘आरटीओ’ कार्यालय ‘स्क्रॅप’ धोरणापासून अनभिज्ञ!, माहिती अधिकारात माहिती देण्यासही टाळाटाळ

या घटनेची माहिती कहुळकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी शासकीय वाहनाने हरदोली सहवनक्षेत्र व बपेरा सहवनक्षेत्र तसे गस्तीपथक तुमसर असे १५ ते २० महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसह गोंडीटोला येथील अतिक्रमण स्थळी पोहचले. त्याठिकाणी महिला व पुरुषांचा जमाव होता व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचा उद्देशाने ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. वनपिरक्षेत्र अधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना ही शासकीय जमीन असल्याने अतिक्रमण करू नका असे सांगितले असता उपस्थित जमावाने लाठ्याकाठ्या, पेट्रोल व कुऱ्हाडी घेऊन वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले व बिट रक्षक कहुळर यांचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ तेथून निघून जा अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने कापून टाकू व पेट्रोल टाकून पेटवून देऊ असे धमकावले. जमावाने शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून व गाडीवर दगडफेक केली असता समोरील काचाला तळे गेले. त्यानंतर वनकर्मचारी अतिक्रमणधारकांचा वाढता दबाव पाहून अनुचित घटना घडू नये म्हणून तेथून निघून गेले. पोलीस ठाणे सिहोरा येथे या सर्व प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली आहे.