बुलढाणा : ब्राम्हण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लक्षवेधीद्वारे विधान भवनात आज शुक्रवारी मांडली.

हेही वाचा – यवतमाळचा युग जर्मनीत फुटबॉलचे धडे गिरवणार; आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

हेही वाचा – रेल्वेने पुण्याला जाताय.. मग हे वाचाच!

गायकवाड म्हणाले की, राज्यातील अनेक ब्राम्हण बांधवांची वाईट अवस्था आहे. खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने अमृत योजना प्रारंभ करण्यात आली आहे. भिक्षुकी करणारे, मंदिरात पूजापाठ करणारे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना कोणत्याही महामंडळाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ गठित करावे. यावर मागणीवर लवकर कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी शासनाच्या वतीने देण्यात आली.