नागपूर : मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले, तरीही त्याचा महिलांना लगेच फायदा होताना दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल याचे कारण काय? कारण हे विधेयक जनगणना झाल्यानंतर लागू होणार आहे.

२०२१ मध्ये जनगणना होणार होती. जी आजपर्यंत होऊ शकलेली नाही. यानंतरही जनगणना कधी होईल हे सांगता येत नाही. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार २०२७ किंवा २०२८ मध्ये ही जनगणना होईल. या जनगणनेनंतर महिला आरक्षण विधेयक लागू होईल.

हेही वाचा – नागपूर : एकनाथ निमगडे हत्याकांडाचा अहवाल सीबीआय न्यायालयात करणार सादर

हेही वाचा – सावधान..! शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करताय? व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी एक जुमला फेकला आहे आणि हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जुमला आहे. मोदी सरकारने आपल्या देशाच्या महिलांबरोबर विश्वासघात केला आहे. त्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.