नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुबंई बाहेर जाण्यासाठी विशेष न्यायालयाने चार आठवडयाची दिलेली मुदत ११ मार्चला संपत आहे. त्यांना नागपूर आणि दिल्ली येथे प्रवास करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी सध्या ते जामिनावर  आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : सी.-२० मध्ये वैदर्भीय संत्र्यांचे ब्रॅण्डिंग करा; बच्चू कडू यांची गडकरी-फडणवीस यांच्याकडे मागणी

देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नागपूर येथे जाण्यास मज्जाव केला होता. मात्र त्याचवेळी त्यांना देशांतर्गत प्रवास करायचा असल्यास न्यायालयाची परवानगी घेण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे. त्यानुसार देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयासह आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयात नागपूर आणि दिल्ली येथे प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या विनंती केली होती. दोन्ही न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली होती. आता ही मुदत संपत आल्याने मुदतवाढ मिळावी म्हणून ते परत दोन्ही न्यायालयात धाव घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex minister anil deshmukh file plea in court seeking permission to go out of mumbai rbt 74 zws
First published on: 08-03-2023 at 13:26 IST