भंडारा : शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोट झाल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा…अमरावती : उपोषण मंडपातच आंदोलकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामाला आले होते. ही शिफ्ट पहाटे ६ वाजता सुरू होते. त्यांनी काम सुरू केल्यानंतर अडीच तासात ही घटना घडली. स्फोट होताच ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अफरातफर उडाली. आग विझवण्यासाठी फॅक्टरीचे अग्नीशमन दल सरसावले आणि लगेच आग आटोक्यात आणली. पण कर्मचारी दहशतीमध्ये आले आहेत. महिनाभरापूर्वी भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीतली स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये तीन कर्मचारी भाजले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे.