लोकसत्ता टीम

वर्धा: सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्यास वीस जून ही मुदत होती. ती आता ५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. पदव्यूत्तर पदवी व पी एच डी चे विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा हेतू आहे.

पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता,आकस्मिक खर्चाचा लाभ मिळेल. पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पी एच डी साठी ४० वर्ष ही कमाल मर्यादा आहे. विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करायचा आहे.

हेही वाचा… दहावी उत्तीर्णांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून जेईई, निटच्या तयारीसाठी मिळवा लाखोंची मदत; जाणून घ्या सविस्तर…

५ जुलै पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय पुणे या पत्त्यावर तो पाठविण्याची सूचना आहे.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.