गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत गणेशोत्सव निमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अडीच हजार किलोचा महाप्रसाद ( सताळलेली डाळ ) तयार करण्यास बुधवारीसकाळी ९ वाजतापासून सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाला भेट देत शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले विविध मंडळांच्या गणेशाचे दर्शन
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अमृत भवन, सीताबर्डी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महप्रसादासाठी ६०० किलो चना डाळ. १७० किलो तेल. शेंगदाणा ५० किलो. हिरवी मिरची व इतर मसाले ५० किलो आदींचा वापर करण्यात आला. महाप्रसाद तयार झाल्यावर तो भक्तांमध्ये वाटप केला जाणार आहे. भक्तीमय अश्या कार्यक्रमात या महाप्रसादाला प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांच्या सुरेल स्वरांची साथ लाभत आहे.