नागपूर: एकल बेलदार समाजाकडून सातत्याने माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, न्याय मिळत नसल्याने काही समाज बांधवांकडून २४ ते २६ दरम्यान नागपुरातील संविधान चौकात उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.

दादासाहेब कन्नमवार यांच्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ६० व्या पुण्यस्मरण दिवशी हे आंदोलन केले जाणार आहे. दादासाहेब कन्नमवार यांनी राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, आयुर्वेद कॉलेज नागपूर, कस्तुरबा गांधी सेवाग्राम, नागपूरचे मेडिकल काॅलेज, ताडोबाला राष्ट्रीय उद्यान दर्जासह इतरही अनेक कामे केली. राज्याच्या घडणात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे सातत्याने एकल बेलदार समाजाकडून नागपूरच्या मेडिकल काॅलेजला दादासाहेब कन्नमवार यांचे नाव द्या, त्यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी व्हावी, त्यांच्यावर शासकीय गौरव ग्रंथ व लघुपट तयार करा, भटक्या विमुक्त जाती, जमातीसाठी घरकुल योजना व इतरही मागणी होत आहे. परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने हे उपोषण असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

हेही वाचा – नियमित कर्ज फेडूनही शेतकरी अनुदानापासून वंचित; राज्य सरकारची घोषणा हवेतच

हेही वाचा – “आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, विरोधकांकडून नुसतीच बोंबाबोंब”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखळी उपोषणाला राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, अरुण आकुलवार, गजानन चंदावार, विनोद आकुलवार, अनिल चव्हाण, राजेश जाजुलवारसह अनेक जण बसणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.