बुलढाणा : बुलढाणा खामगाव (बोथा) मार्गावरील भादोलानजीक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले. दैव बलवत्तर म्हणून पाच वर्षांचा बालक सुखरूप बचावला. तिन्ही मृतक भादोला (ता. बुलढाणा) येथील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एकाच दुचाकीवरून चार जण गावाकडे जात असताना मोरे पेट्रोलपंपानजीकच्या पोखरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे वाहनावरील तिघे जण दगावले. त्यांच्या सोबतचा चिमुकला मात्र सुदैवाने बचावला. बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2023 रोजी प्रकाशित
बुलढाणा : बोथा मार्गावर भीषण अपघात; तिघे ठार, चिमुकला बचावला
बुलढाणा खामगाव (बोथा) मार्गावरील भादोलानजीक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-10-2023 at 18:33 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatal accident on botha road three people were killed the child survived scm 61 ysh