बुलढाणा : वयोवृद्ध सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेची व नातवाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आदिवासीबहुल संग्रामपूर येथे आज घडली. यामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. यामुळे घटनेचा तपशील कळू शकला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, संग्रामपूर शहरात आज, मंगळवारी ही घटना घडली.

हेही वाचा >>> नागपूर : बलात्काराच्या आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, हुडकेश्वर पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत

Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

यामध्ये ६५ वर्षीय आरोपी नारायण गायकी याने राहत्या घरातच आपल्या गर्भवती सून अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामुळे ८ वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे.