वर्धा : वर्धा तालुक्यातील पवनूर गाव आज सुन्न झाले आहे. शेतकरी कुटुंबातील वैष्णवी पुंडलिक बावणे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करीत जीवन संपविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती शनिवारी बारावीचा पेपर देऊन घरी आली होती. थोड्या वेळाने शेतात गेली. काही वेळाने घरी परतली. तेव्हा ती विचारातच असल्याचे सांगितल्या जाते. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने ती भयग्रस्त झाली होती. भीतीने विचारातच असतानाच घरी कोणीही नसल्याचे पाहून तिने विषारी औषध प्राशन केले.

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

हेही वाचा – नागपूर : औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचे बंधारे फुटणे संशयास्पद! किसान मंचचे राष्ट्रीय महासचिव प्रताप गोस्वामी यांचे मत

हा आत्महत्येचा प्रकार रात्रीच तिच्या काकाने पाहिला. त्याचवेळी तिला आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती बिघडत चालली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पुढील आवश्यक उपचारासाठी वर्धेच्या सामान्य रुग्णालयात रेफर केले. मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी झाल्यावर अंत्यविधी करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of failing exams girl committed suicide the incident at pavnur in wardha pmd 64 ssb
First published on: 27-02-2024 at 11:23 IST