वर्धा : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात विकसित झालेला राष्ट्रीय महामार्ग ४४ हा काश्मीर ते कन्याकुमारी असा विस्तारला आहे. देशातील सर्वात मोठा मार्ग म्हणून ओळख असलेल्या या मार्गाने हिंगणघाटकरांना भयग्रस्त केले आहे.

मार्गावरील जाम ते वना पूल दरम्यान गत दोन महिन्यांत पंधरा अपघातात सात बळी जाण्याची नोंद झाली आहे. अपघात टाळण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदीले यांनी निदर्शनास आणले. महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील नंदोरी चौकपुढे कायमस्वरुपी लोखंडी बॅरिकेड्स लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील वाहतूक रेल्वे उड्डाणपुलाखालून वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे अपघात टळू शकतात, अशी लोकभावना असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – संतनगरी शेगावमध्ये ‘मटण नाट्य’ने खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने वातावरण संतप्त झाले आहे. वांदिले यांनी प्रशासनास निवेदन देताना सात दिवसांत उपाय करण्याची विनंती केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा महामार्ग धोकादायक झाल्याची भावना चेतन वाघमारे यांनी व्यक्त केली.