लोकसत्ता टीम

नागपूर: उपराजधानीतून एसटीची पहिली ‘लक्झरी स्लिपर कोच’ शनिवारी दुपारी ३ वाजता पुण्याच्या दिशेने रवाना झाली. ही बस रविवारी सकाळी ९.२० दरम्यान पुणे येथे पोहचेल. पुण्याहून पहिली लक्झरी स्लिपर कोचबस रविवारी नागपुरात पोहचणार आहे.

गणेशपेठ बसस्थानकावर आमदार मोहन मते यांनी हिरवा झेंडा दाखवून बसचा शुभारंभ केला. याप्रसंगी श्रीकांत गभणे, प्रल्हाद घुले, नीलेश धारगावे, कुलदीप रंगारी, गौतम शेंडे यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूरहून निघालेल्या पहिल्या बसमध्ये गणेशपेठहून १६ आणि रविनगर येथून ३ असे एकूण १९ प्रवासी बसले.

आणखी वाचा-अवघ्या ४० लोकवस्तीच्या गावातील प्रियाची उच्चशिक्षणासाठी लंडनवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बसचे भाडे १,५९५ रुपये आहे. दिवाळीपूर्वी ही बस सुरू झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यावेळी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे म्हणाले, प्रवाशांना लक्झरीचा अनुभव देणाऱ्या या सहा नव्या कोच्या बसेस नागपूर- पुणे मार्गावर सुरू झाल्या आहेत. या बसला नागपूर ते पुणे दरम्यान कोंढाळी, तळेगाव, कारंजा, अमरावती, चिखली, औरंगाबादसह एकूण १४ थांबे राहणार आहेत.