scorecardresearch

‘समृद्धी’चा पहिला टप्पा मेपर्यंत ; एकनाथ शिंदे यांचे संकेत

केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप  शिंदे यांनी  केला.

नागपूर : समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या दरम्यानचा पहिला टप्पा मेपर्यंत सुरू करण्याचे संकेत नागर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. शिंदे रविवारी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले, समृद्धी मार्गाची पाहणी करायला आलो आहे. या द्रूतगती मार्गाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मे महिन्यात पहिला टप्पा सुरू करण्याचा मानस आहे, असे शिंदे म्हणाले.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाहीत. शरद पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. मात्र त्याबाबत काय बोलणे झाले याची माहिती नाही.

तपास यंत्रणांकडून शिवसेना लक्ष्य

केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप  शिंदे यांनी  केला. मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्रीच्या नोंदीबाबत त्यांनी बोलणे टाळले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First phase of samruddhi expressway will by ready by may eknath shinde zws

ताज्या बातम्या