नागपूर : सरोगसी कायदा २०२१ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यात प्रथमच एका सरोगेट मदर प्रकरणाला मंजुरी दिली गेली.

मंडळाच्या सदस्यांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तथा डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी थोरात, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मडावी, डॉ. जयश्री वैद्य आहेत. जिल्ह्यामध्ये कुठेही अनधिकृत सरोगसी होऊ नये म्हणून शासनाने नवीन कायद्यानुसार जिल्हा वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे. सरोगेट मदरसाठी या मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

हेही वाचा…नागपूर : विद्यापीठाच्या मैदानावर भाजप अध्यक्ष नड्डा यांचे भाषण; विद्यार्थी संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण…

मंजुरी दिलेल्या प्रकरणात अत्यावश्यकता प्रमाणपत्र, पात्रता प्रमाणपत्र मिळण्यासाठी या कार्यालयाकडे प्राप्त अर्जावर मंडळाने निर्णय घेण्यापूर्वी सरोगेट आई कोणाच्याही दबावाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता इच्छेनुसार सरोगसी प्रक्रियेला सामोरे जात असल्याची खात्री प्रत्यक्ष मुलाखत घेऊन केल्या गेली. तसेच सरोगेट आई व सरोगसी इच्छुक कुटुंबीयांच्या शारीरिक व मानसिक वैद्यकीय अहवालाच्या आधारावर मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली. या बैठकीस मंडळातील सदस्यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. रिना लांजेवार व ॲड. आनंद भिसे व सरोगसी इच्छुक कुटुंबीय, सरोगेट आई उपस्थित होते.

हेही वाचा…मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरोगसी म्हणजे काय ?

सरोगसीच्या मदतीने अनेक महिला पालक बनत आहेत. भारतातही सरोगसीचा ट्रेंड खूप वाढला आहे. ज्या महिला प्रजनन क्षमता, गर्भपात किंवा धोकादायक गर्भधारणेमुळे गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सरोगसीचा पर्याय अतिशय फायदेशीर ठरतो. सरोगसी म्हणजे जेव्हा एखादे जोडपे मुलाला जन्म देण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या गर्भाचा वापर करतात, तेव्हा या प्रक्रियेला सरोगसी म्हणतात. म्हणजेच सरोगसीमध्ये दुसरी स्त्री स्वत: किंवा दुसऱ्या दात्यासाठी गर्भधारणा करते. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या किंवा डोनरच्या एग्सद्वारे दुसऱ्याचे मूल तिच्या गर्भात वाढविते तिला सरोगेट मदर म्हणतात.