अकोला : ‘फुलोंके रंगसे…’ अशा शब्दांनी साहित्यिक, कविंपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुले, ही निसर्गाची एक सुंदर रचना. नयनरम्य, सुंदर, सुवासिक, रंगीत फुलांचे सर्वांनाच विशेष आकर्षण. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र विभागाच्या फुलशेतीच्या विविध प्रक्षेत्रातली बहरुन आलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे.

सदिच्छा आणि शुभेच्छांचे ‘टोकन’ असलेल्या फुलांची शेती आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन या व्यतिरिक्त फुलांची सजावट, विक्री, फुलमाळा बनवणे यातून एक मोठी  चलनाची ‘माळ’ गुंफली जाते. गुलाब, कमळ, झेंडू, एस्टर, वॉटरलिली, लिली, डेझी, गेलार्डिया, झेंडू, हिवाळी हंगामातील पेटुनिया, वर्वेना, गॅझेनिया, पेंटास, बिगोनिया, डायनथस, झिनिया, विंका आदींसह अनेक देशी विदेशी फुलांनी  येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाची फुलशेती सध्या बहरली आली आहे. या विभागातून मिळणारे प्रशिक्षण, सेवा या जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा : अवकाळी पावसाचा १ हजार ८६ हेक्टर क्षेत्राला फटका, ४८ गावांतील शेतकरी हवालदिल

सध्या गुलाब, झेंडूचा बहर आला आहे. विविध रंगी, आकारांने वैविध्यपूर्ण फुलांचे दृष्य नयनरम्य ठरत आहे. सोबतच एस्टर, वॉटरलिली, लिली, डेझी, गेलार्डिया, झेंडू, हिवाळी हंगामातील विविध प्रकारच्या फुल पिकांची लागवड करून त्यांच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यावर संशोधन केले जाते.

पुष्पगुच्छ, माळा तयार करण्यापासून ते विविध प्रयोजनांना फुलांची सजावट ही कार्यक्रमाची शोभा वाढवते. केवळ फुल शेतीच नव्हे तर या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व घटकांना त्यातून रोजगार उपलब्ध होत असतो. या केंद्रात साडेबारा एकरहून अधिक क्षेत्रात विविध फुलांची लागवड करण्यात आली आहे. त्यांवर संशोधन होते, त्यांच्या विविध प्रजाती विकसित करुन शेतकऱ्यांना किफायतशिर ठरणारे वाण तयार केले जातात. फुलशेती, बाग विकसित करण्यासाठी प्रशिक्षित माळी तयार करणे असे विविध अभ्यासक्रमही येथे चालवले जातात.  त्यातून फुलांची शेती, हरितगृहात फुलशेती, निर्यातक्षम फुलांचा विकास आदींचे धडे दिले जातात. विदर्भातील शेतकरी येथे येऊन मार्गदर्शन घेत असतात. येथील रोप वाटीकेतून  रोपांची विक्रीही  केली जाते, अशी माहिती विभागातून देण्यात आली.

हेही वाचा >>>गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!

गुलाबाचे ५० हूनअधिक, तर कमळाचे आठ प्रकार

कृषी विद्यापीठाच्या केंद्रात गुलाबाच्या ५० हून अधिक प्रकार, जाती आहेत. क्रायसॅन्थेममच्या ११५, ग्लॅडिओलसच्या ६५, ट्यूबरोज १२, एस्टरच्या चार, झेंडूचे दोन, वॉटरलिली ८४, लिली आठ, कमळाच्या आठ आदींसह असंख्य प्रकारची फुले येथे उमलली आहेत. या शिवाय विविध प्रकारचे सावलीत लावता येणारी शोभेची रोपे, शोभेचे निवडूंग, कमी जागेत विकसित करण्यासाठी लागणारे रोपांची लागवड केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुलशेती पारंपारिक शेतीसोबत फायदेशीर

फुलशेती पारंपरिक शेतीसोबत फायदेशीर आहे. ही शेती पारंपारिक शेतीला पुरक व्यवसाय तर देतच शिवाय सुत्रकृमी व किडींना आकर्षित करुन मुख्य पिक सुरक्षित ठेवण्यासाठीही त्याचा फायदा होतो. शिवाय किटक, मधमाश्याम फुलपाखरे आकर्षित होत असल्याने त्याचाही फायदा मुख्य पिकाला होतो.