चंद्रपूर : सलग चौथ्या दिवशीसुद्धा चंद्रपूरच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. शुक्रवारचे तापमान ४२.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. चंद्रपूरचे तापमान सलग चौथ्या दिवशीही राज्यात सर्वाधिक होते. त्यामुळे एप्रिल महिन्यातच चंद्रपूरकरांना उन्हाच्या झळा सोसवेनाशा झाल्या आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. ११ एप्रिलचे चंद्रपूर तापमान ४१, १२ एप्रिल बुधवारचे तापमान ४२.२ तर बुधवारचे तापमान राज्यात सर्वाधिक होते. १३ एप्रिल २०२३ ला सलग तिसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ होत ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. तर चौथ्या दिवशीही चंद्रपूर शहरावर सूर्य कोपला आहे. शुक्रवारी ४२.८ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली आहे. चंद्रपूर शुक्रवारचे तापमान राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होणार आहे.
