नागपूर : सगळ्याच न्यायालयांसह केंद्रीय तपास यंत्रणांवर मोदी सरकारचा दबाव आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयही जनहिताचे बोलतात, परंतु निर्णय मात्र वेगळाच देतात, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित ‘आमच्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी राजकीय लोकशाही’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रा. सुषमा भड, योगेंद्र सरदार, राजू गायकवाड, सचिन काळे, मिलिंद पखाले उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचे प्रकरण बघितले तर शिंदेंनी सर्व नियम मोडल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगते, परंतु आताही मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा बँकेतील ३६० पदांची नोकर भरती टीसीएस कंपनीच्या माध्यमातून होणार

सध्या ईडीने अटक केलेल्या विविध नेत्यांसह इतरांनी न्यायालयात धाव घेतल्यावर तेथीलही काही निकाल बघितले तर जणू मोदींविरोधात निकाल द्यायचा नाही, असेच चित्र दिसते. सीएजी संस्थेने मोदी सरकारला खर्चाचा हिशोब मागितला तर तेथील अधिकाऱ्यांची बदली होते. त्यामुळे देशात लोकशाही आहे काय, हा प्रश्न उपस्थित होतो. सध्या देशात कुणीही मोदींच्या विरोधात बोलला तर तो जेलमध्ये जातो, असे चित्र आहे. परंतु मला कुणाचीही भीती नसून मी जेलमध्ये जायला तयार आहे. परंतु २०२४ मध्ये मोदी पुन्हा येणार नसल्याने मला ही भीतीही नसल्याचे कोळसे पाटील म्हणाले. संघ ही जगातील सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना आहे. माझे संघासोबत वैयक्तिक मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे या संघटनेविरोधात लढणारच, असेही कोळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा – धक्कादायक..! समृद्धीवर प्रत्येक दोन दिवसांत एक बळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस, गडकरींच्या पराभवासाठी आलो

नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी असे संघाचे दोन म्होरके आहेत. या दोघांनीही राज्य व देशाची वाट लावली आहे. त्यांना पुढच्या निवडणुकीत पाडण्याचे नियोजन करण्यासाठी मी नागपुरात आलो आहे. फडणवीस यांनी राज्यातील राजकारणाचा स्तर खूपच खाली आणला आहे, असेही कोळसे पाटील म्हणाले.