चंद्रपूर : भारतीय जनता पक्षद्वारा मिशन २०२४ अंतर्गत मोदी@९ जनसंपर्क अभियान ३० मे २०२३ पासून राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात सुरु करण्यात येत असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अभियान संयोजक म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नियुक्ती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असल्याने सरकारची उपलब्धी गोरगरीब सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले कार्य, विविध महत्वाकांक्षी योजना, शेतकरी कामगार, युवक, महिलांसाठीच्या विविध योजनांची उपलब्धी, मोदी सरकारचे राष्ट्रोन्नतीचे कार्य या सर्व उपलब्ध्या घेवून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या जनसंपर्क अभियानातून केला जाईल असे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.महिनाभराच्या या महासंपर्क अभियानाअंतर्गत लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रात पत्रकार परिषदा, विशाल रॅली, सोशल मिडीया बैठका, व्यापारी सम्मेलने, विविध क्षेत्रातील प्रबुध्द नागरीकांचे सम्मेलन व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.

Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?

मोदी@९ जनसंपर्क अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या ९ वर्षातील समाजाभिमुख लोकाभिमुख, विकासाभिमुख व राष्ट्राभिमुख योजनांची उपलब्धी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. मिशन २०२४ लोकसभा तसेच अन्य निवडणुकात भाजपाला देदिप्यमान यश संपादन करण्यासाठी सर्वांनी या जनसंपर्क महाअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन अहीर यांनी केले आहे.