चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या डोमा बीटातील शिवरा गावात वाघाने धुमाकूळ घातला आहे. पुन्हा एकदा नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.  

रविवार, २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी शिवराचे माजी सरपंच नीलकंठ भुरे (६०) यांच्यावर वाघाने हल्ला केला असता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार २७ ऑक्टोबरचे सकाळी उघडकीस आली. मागील नऊ दिवसात जिल्ह्यात वाघाने चार जणांचा बळी घेतल्याने मानव – वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

रविवारी सायंकाळच्या सुमारास शेतकरी तथा शिवरा गावचे सरपंच नीलकंठ भुरे हे शेतात गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, याच परिसरात अवघ्या एका महिन्यात वाघाच्या हल्ल्यातील ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.