बुलढाणा : बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी आरोपी चार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अमरावती विभागीय मंडळाच्या सचिवांच्या आदेशाने आरोपी शिक्षकांच्या शिक्षणसंस्था संचालकांना कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदेशावरून लोणार येथील झाकीर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अब्दुल अकील अब्दुल मुनाफ, लोणार येथीलच सेंट्रल पब्लिक स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक अकुंश पृथ्वीराज चव्हाण, किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गजानन शेषराव आडे आणि शेंदुर्जन येथील संस्कार ज्युनिअर कॉलेजचे गोपाल दामोदर शिंगणे या चारही शिक्षकांना निलंबित करण्यात आले.

हेही वाचा – नागपूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

हेही वाचा – अमरावती : रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ; राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा

पेपर फूटप्रकरणी पोलिसांसोबत शिक्षण विभागदेखील दोषींवर आपल्या माध्यमातून कारवाई करत आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात साखरखेर्डा पोलिसांच्या ताब्यात असलेले चार आरोपी शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने चार शिक्षणसंस्था संचालकांना दिले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना ही माहिती दिली. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानंतर बुलढाणा शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four teachers suspended in connection with 12th math paper leak in buldhana scm 61 ssb
First published on: 09-03-2023 at 17:07 IST