चंद्रपूर : वरोरा शहरातील रत्नमाला चौकनजीक असलेल्या इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये दहा वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दुधगवळी या तीनजणांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकाजवळ इसाफ स्मॉल फायनान्स बँक आहे. या बँकेमध्ये मार्च ते ८ मे २०२३ दरम्यान दहा वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दुधगवळी यांनी सोन्याचे दागिने ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज उचलले. नंतर अधिकाऱ्यांनी बँकेचे ऑडिट केले असता या सर्व सोन्याच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढविल्याचे दिसून आले. त्यामुळे ते सोने बनावटी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत बँक व्यवस्थापकाने वरोरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – नागपूर: शिक्षिकेची मुलीसह आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरोरा शहरात पहिल्यांदाच बँकेत बनावट सोन्याचे दागिने ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरोरा पोलीस करीत आहे.