झारखंड आणि ओडिशातून स्थलांतरित झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात मुक्कामी असून धानोरा, कुरखेडा तालुक्यातील घनदाट जंगलात त्यांचा वावर आहे. मात्र, हा कळप आजपर्यंत कुणाच्या पाहणीत आला नव्हता. केवळ त्यांच्या पाऊलखुणा आढळून यायच्या. काल कुरखेडा तालुक्यातील वाघेडा-आंधळी जंगलात या कळपाचा मुक्तसंचार काही नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. यात पूर्ण कळप स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लागले आझादीचे नारे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तींचा कळप जिल्ह्यातील धानोरा आणि कुरखेडा जंगलात मुक्कामी आहे. ज्या भागातून कळप गेला त्या भागातील शेती व घरांचे नुकसान झाले आहे. दिवस जंगलात घालविल्यानंतर रात्रीच्या सुमारास हा कळप गावाच्या वेशीवर येत असल्याने गावांतील नागरिक रात्र जागून काढत आहेत. सध्या हा कळप कुरखेडा तालुक्यातील वाघेडा – आंधळी परिसरातील जंगलात आहे. काल काही नागरिकांनी या कळपाची चित्रफीत आपल्या भ्रमणध्वनींमध्ये टिपली. यामुळे पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे हे रानटी हत्ती पाहायला मिळाले. वन विभाग वारंवार सूचन देऊनही काही अतिउत्साही नागरिक कळपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, असे करणे त्यांच्या जीवावर बेतू शकते, असे वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.