नागपूर : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाड्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गुरुवारी सकाळपासून गर्दी झाली. ‘जय जय विठोबा रखुमाई’, असा जयघोष व टाळ मृदंगाचा नादात आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी आणि दर्शनार्थी येऊ लागले आहेत.

हेही वाचा – नागपूर : आईपासून दुरावलेले ‘ते’ पिलू अखेर आईच्या कुशीत

दरवर्षी आषाढी एकादशीला धापेवाड्याला नागपूर जिल्हा व परिसरातील भाविकांची गर्दी होते. अनेक दिंड्या विठ्ठलनामाचा जयघोष करीत धापेवाड्यात दाखल होत असून आजही सकाळपासून दिंड्या पोहोचल्या. यंदा ग्रामपंचायत, देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात भाविकांसाठी व्यवस्था केली आहे.

हेही वाचा – राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होणारे रामायण सांस्कृतिक केंद्र कसे आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्शनार्थींची संख्या बघता मंदिर परिसरात कठडे उभारण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर पूल बांधल्याने भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी मोठी सोय झाली आहे. या यात्रेसाठी कळमेश्वर, मोहपा, काटोल, सावनेर, नागपूर येथून विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे.