गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने एका जहाल नक्षलवाद्यास अटक केली. वेल्ला केसे वेलादी (३५ रा. येडापल्ली) असे अटक केलेल्या नक्षवाद्याचे नाव असून तो छत्तीसगड राज्याचा रहिवासी आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर: वाघ जुमाणेना…. गुराखी ठार, गोठ्यात शिरून बैलाचाही घेतला घास!

टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान वाढवले आहे. दरम्यान गुरुवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने कारवाई करीत जहाल नक्षलवादी वेल्ला वेलादी यास अटक केली. तो २००१ पासून नक्षल चळवळीत कार्यरत होता.

हेही वाचा >>>भंडारा: मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, दहावीच्या विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनमीलिशिया सदस्य, संड्रा दलम सदस्य अशा विविध पदावर असताना वेल्ला याने अनेक हिंसक कारवाया पार पाडल्या. जाळपोळ, खून, चकमक, दरोडा अशा विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. टेकामेटा चकमकीदरम्यान त्याने जहाल नक्षल नेता भास्कर याला पळून जाण्यास देखील मदत केली होती. त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस विभागाने दिली.