पर्यावरण पूरक वाहानांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न वाहन निर्मिती कंपन्यांनी करावा,असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

महापालिकच्या परिवहन विभागाच्या वाहन ताफ्यात दाखल १७ इलेक्ट्रिक तसेच डिजिटल बस सेवेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी झिरो माईल चौक ते जिपीओ चौकपर्यत बसमधून प्रवास केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी म्हणाले, इलेक्ट्रिक,सीएजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग सर्वसामान्यांनी करावा यासाठी या वाहनांच्या किंमती कराव्या.यामुळे विक्री वाढेल. देशात इलेक्ट्रिक वाहने तयार करणाऱ्या कपन्यांची संख्या २५० च्या जवळपास झाली आहे. दुचाकी वाहने इलेक्ट्रिक आणि इथेनॉलपासून चालवली गेली तर प्रदूषणपासून मुक्ती मिळेल. देशात इलेक्ट्रीक, मिथेनॉल, सीएनजी हे देशाचे भविष्य असून त्यापासून रोजगार निर्माण आणि गाव प्रदूषण मुक्त होईल असेही गडकरी म्हणाले.