चंद्रपूर : अनंत चतुर्दशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी गणराया निरोप घेत आहे, तर याच दिवशी ईद सणही आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद होऊ नये, यासाठी २८ सप्टेंबरला बॅनर, स्वागत गेट, कमानी, पताका उभारू वा लावू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा – आयएएसचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ध्येयवेड्या सोहमचे मुनगंटीवार यांनी केले कौतुक!
हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यातील १८१ शाळा बंद होण्याची शक्यता, कारण काय? जाणून घ्या…
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठे गणेश मंडळ, राजकीय, सामाजिक पक्ष, सेवाभावी संघटना यांच्याद्वारे शहरातील मुख्य चौक, दर्शनी मार्ग, महात्मा गांधी रोड, पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट, अंचलेश्वर गेट ते गांधी चौक व कस्तुरबा रोड या मुख्य मिरवणुकीच्या मार्गांवर व परिसरात पताका, तोरण, विद्युत रोषणाई, स्वागत गेट, कमानी, होर्डींग, बॅनर, पोस्टर्स लावले जातात. यंदा गणेश विसर्जन आणि ईद एकाच दिवशी आली आहे. ईदनिमित्त मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. मुस्लीम समाजातर्फेदेखील पताका, तोरण, विद्युत रोषणाई, स्वागत गेट, कमानी, होर्डींग, बॅनर, पोस्टर्स लावले जातात. अशा स्थितीत पताका, तोरण, कमानी, होर्डींग, बॅनर, पोस्टर्स इत्यादी नकळत तुटणे, काही अंशी क्षती होणे, नुकसान होणे यासारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिकेने यावर निर्बंध लादले आहेत.