नागपूर : शहरातील कुख्यात गँगस्टर तिरुपती ऊर्फ रुपेश बाबुराव भोगे याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने भोगेला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तिरूपतीच्या अटकेमुळे टोळीतील गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून काहींनी पळ काढला.

तिरूपती भोगेवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. तो धान्य तस्करी, सट्टापट्टी, जुगार आणि गांजा तस्करीत सक्रिय आहे. इमरान नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने तो कारवाई टाळतो. इमरान हा जरीपटक्यातील अवैध धंदेवाल्यांकडून वरिष्ठांसाठी वसुलीचे काम करीत असून तिरूपतीचा खबऱ्या असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप? या तारखेपर्यंत दिली वेळ

हेही वाचा – नागपूर : चांगल्या आरोग्यासाठी दाम्पत्याने घरात मांडली पूजा, मग भोंदूबाबाने केले असे की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुख्यात सुमीत ठाकूरने कमल नाईक नावाच्या युवकाचे अपहरण करून लुटमार केली होती. त्या कमल नाईकला तिरूपती भोगेने धमकी देऊन तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकला होता. या प्रकरणी तिरूपतीवर गुन्हा दखाल करण्यात आला आहे. तिरूपतीने धान्यतस्कर वसीम, इजराईल, सोनू, मोनू पठाण, आदिल, शेख यांच्याशी हातमिळवणी करून धान्यतस्करी सुरू केली आहे. त्यामुळे तिरूपतीवर पोलिसांचे लक्ष होते.