वर्धा : ग्रामीणभागात शेतीपूरक उद्योग म्हणून कुक्कूटपालनाचा व्यवसाय केल्या जातो. मात्र आता मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय होत असल्याने गावरानी कोंबडी मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे.

याच कोंबडीच्या प्रेमात असणाऱ्या मांसाहारी खवय्यांना आता याच चवीची कोंबडी उपलब्ध झाली आहे. किंमत मात्र तगडी. थेट तामिळनाडूतून या कोंबड्या वर्धेत आल्या आहे. येथील इथापे फॉर्म्स वर तीन महिन्यापूर्वी कोंबडा प्रती नग सहा तर कोंबडी चार हजार रुपये या दराने  आणलेल्या या कोंबडीचे दिलेले तीन महिन्याचे पिल्लू आता सहाशे ते आठशे रुपये दराने विकल्या जात आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: ब्रम्हपुरी वनपिरक्षेत्रात आढळला दुर्मिळ ‘फोस्र्टेन कॅट स्नेक

महिन्यात पंधरा अंडी देणाऱ्या या अंड्याची प्रती नग किंमत तब्बल पन्नास रुपये आहे.कोंबडा प्रामुख्याने प्रजनन व झुंजी साठी उपयोगात येतो. तर कोंबडी रुचकर मास म्हणून विकल्या जाते. तामिळनाडूतून चंद्रपूरचा दलाल विक्रीसाठी आणतो.

वाहतूक व अन्य खर्चामुळे हा दर वाढतो.अल्पशा खाद्यावर गुजरान करणाऱ्या या कोंबड्या कोंडून ठेवण्याऐवजी शेतात मुक्तसंचार पद्धतीने पाळल्यास उत्पादकस अधिक लाभ मिळतो.अंडी अधिक पिवळसर व गावरानी कोंबडीच्या अंड्या पेक्षा मोठे असते. असील जातीची ही प्रजाती आहे.वजन अवघ्या एका वर्षात तीन किलोवर जाते.

हेही वाचा >>> चंद्रपूर: नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ होणार सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मटणाच्या दराने कोंबडीचे मास विकल्या जाते. व चव पण तशीच असल्याचे इथापे बंधू सांगतात. एवढ्या महाग दराने मास घेणारे ग्राहक आहेत का,अशी विचारणा केल्यावर उत्तर मिळते की एकदा चवीच्या प्रेमात पडणारे मग वारंवार मागणी करीत असतात.अन्यथा ज्या दलालाकडून विकत आणले तोच पिल्लं विकत घ्यायला तयार असतो. भारतभर या कोंबड्या विकल्या जातात.विदर्भात अद्याप त्या प्रचलित व्हायच्या असल्याची माहिती मिळाली.इथापे फॉर्म्स वर ‘ हॅचींग ‘ ची व्यवस्था असल्याने सोयीनुसार पिल्लं हवी तेव्हा उपलब्ध होत आहेत. गत एक दशकापासून कुक्कुट व्यवसायात असणारे इथापे बंधू कोंबड्या कधीच बंदिस्त न ठेवता त्यांना  शेतात मुक्तपणे पाळतात.