लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरसह देशाच्या इतर भागात सोने- चांदीचे दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी (९ एप्रिल) चार तासांत सोन्याचे दर ३०० रुपये प्रति १० ग्राम तर चांदीचे दर ४०० रुपये प्रती किलोने वाढले. त्यामुळे ग्राहकांना दागिने खरेदी करतांना जास्त खिसा रिकामा करावा लागला.

नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे गुढीपाडव्याच्या निमित्याने सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली. त्यासाठी अनेक ग्राहकांनी अग्रिम दागिन्यांची नोंदणी केली. परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी ते मुहर्ताला घरी दागिने घरी घेऊन गेले. तर बरेच ग्राहक गुढीपाडव्यालाच दागिने खरेदीसाठी आले होते. दरम्यान ९ एप्रिलला दुपारी १ वाजता नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७१ हजार ९००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ८२ हजार ७०० रुपये होते.

आणखी वाचा-श्रीरामाच्या रामटेकात मोदी कोणाला लक्ष्य करणार ?

हे दर ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता २४ कॅरेट सोन्यासाठी प्रती दहा ग्राम ७१ हजार ६००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८२ हजार ९०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात ९ एप्रिल २०२४ या गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ चार तासांमध्ये सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी २०० रुपयांनी वाढल्याचे पुढे आले. तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांना जास्त खिसा रिकामा करावा लागला.