नागपूर: करोनानंतर सोन्याचे दर नियंत्रणातच येत नाही. भारत- पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण होण्यासह दोन्ही देशात शस्त्रसंधीनंतरही सोन्याच्या दरात मोठे चढ- उतार बघायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (१९ मे २०२५ रोजी) नागपुरात सोन्याचे दर तीनच तासात किंचित घटले. आज नागपुरात सोन्याचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील सराफा बाजारात १९ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९४ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७३ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये होते. त्यानंतर तीन तासानंतर दुपारी १ वाजता नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७३ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६० हजार ९०० रुपये नोंदवले गेले.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर सकाळी १० वाजताच्या तुलनेत तीन तासानंतर दुपारी १ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. त्यातच जम्मू कश्मिर येथील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर शस्त्रसंधीमुळे दोन्ही देशात तणाव हळू- हळू कमी होत आहे. या कालावधीतही कधी सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरतांना तर कधी वाढतांनाचे चित्र आहे. त्यामुळे सोन्याचे दर नियंत्रणात येणार कधी? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दरम्यान नागपुरात २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९९ हजार ४०० रुपयांवर गेले होते. दोन्ही शुल्क जोडल्यास हे दर प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांवर होते, हे विशेष.

चांदीच्या दरातही घसरण…

आठवड्याच्या पहिल्याच दिवसी सोमवारी (१९ मे २०२५ रोजी) नागपुरात चांदीचे दर सकाळी १० वाजता ९६ हजार ७०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले होते. हे दर दुपारी १ वाजता प्रति किलो ९६ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात सकाळी १० वाजताच्या तुलनेत तीन तासांनी दुपारी १ वाजता २०० रुपये घट झालेली दिसत आहे. तर प्लॅटिनम धातूचे दरही प्रति १० ग्राम ४४ हजार रुपये नोंदवले गेले.