हक्काच्या आरक्षणात होणारी ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी आक्रमक असलेल्या गोरसेनेच्या वतीने आज बुलढाणा चिखली राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले. 

हेही वाचा >>> बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक; अकोल्यात २५ मागण्यांच्या निवेदनाची होळी, रास्ता रोको

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. त्रिशरण चौकात  जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विमुक्त जातींच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मुळ जातीचे बोगस प्रमाण पत्र काढून बिगर मागास जातीतील घटकांनी शासकीय नोक-या व शैक्षणिक जागेवर अतिक्रमण केले आहे. यापरिनामी विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय होत आहे. या निषेधार्थ आज बुलढाण्यासह राज्यभरात  आंदोलन करण्यात आले. यानंतर शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात अभय चव्हाण, सोनु चव्हाण, परसराम राठोड, राम राठोड, पुनम राठोड, प्रताप राठोड, सागर राठोड, राजु राठोड, गणेश राठोड, रितेश चव्हाण, उमेश चव्हाण, साहेबराव पवार यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले.