राजकारणात एखाद्या विषयावर वैचारिक मतभेद असावेत, मनभेद असू नये, असे म्हणतात. जिल्ह्यातील नेतेही राजकारण बाजूला ठेवून एका मंचावर खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र येतांना दिसत आहे. यापूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर व अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यात काही विषयांवर वाद विकोपाला गेले होते. परंतु, या नेत्यांनी व्यक्तीगत मनभेद न बाळगता पून्हा एकदा एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत.

हेही वाचा- होळीनिमित्त पुण्याहून नागपूरसाठी विशेष रेल्वेगाडी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार एकत्र आले होते. विशेष म्हणजे या तिन्ही नेत्यांमध्ये अवघ्या काही महिन्यापर्यंत टोकाचे भांडण झाले होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आझाद बगीच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी स्थानिक आमदार व खासदार असतांनाही भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी डावलल्यामुळे मुनगंटीवार, धानोरकर व जोरगेवार यांच्यात टोकाचा वाद झाला होता. त्यात मुनगंटीवार व धानोरकर यांनी हसत खेळत हा वाद मिटविला. मात्र मुनगंटीवार व जोरगेवार यांचा वाद सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना पाहून घेण्यापर्यंत गेला होता. तेव्हा दोघांच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली होती. त्यानंतरही एक दोन वेळा या दोन्ही नेत्यांमध्ये अशाच प्रकारे शाब्दीक चकमक उडाली होती. राज्यातील सत्तेत सहभागी हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

हेही वाचा- गडचिरोली : विदेशी पर्यटकांसाठी वाघाची शिकार आयोजित करणारे ‘पोर्ला इस्टेट’चे नवाब! वाचा सविस्तर…

परंतु, कुणबी समाजाच्यावतीने आयोजित कृषी मेळाव्यात व आता ताडोबा वर्धापन दिन कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर आजूबाजूला बसले होते. हळूहळू या दोन्ही नेत्यांमधील स्नेह वाढतांना दिसत आहे. त्याच प्रकारे जिल्हा क्रिडांगण येथे ट्रॅकचे लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री मुनगंटीवार यांना दोन तास उशिर झाला. यामुळे संतापलेले खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर लोकार्पण करून निघून गेले. यावेळी धानोरकर दाम्प्त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली होती. या टिकेला मुनगंटीवार यांनीही प्रतिउत्तर दिले होते. तेव्हाही या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वणवा चांगलाच तापेल असा अंदाज माध्यमांनी बांधला होता.

हेही वाचा- नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पाची कागदपत्रे आता संकेतस्थळावर, नागरिकांची फसवणूक टाळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, माध्यमांचा हा अंदाज खोटा ठरवित मुनगंटीवार व धानोरकर हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. याचाच अर्थ राजकीय व वैचारिक मतभेद ठेवत या नेत्यांनी व्यक्तीगत मनभेद येवू दिले नाहीत. राजकीय वादानंतर नेत्यांमधील या स्नेहाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.