scorecardresearch

मुंबई मनपातील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; गुलाबराव पाटील म्हणाले, “कोणतं कार्यालय कोणाला द्यावं, हे…”

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने ताबा घेतला आहे. यावरून पुन्हा एकदा दोन्ही गटातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई मनपातील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; गुलाबराव पाटील म्हणाले, “कोणतं कार्यालय कोणाला द्यावं, हे…”
गुलाबराव पाटील ( संग्रहित छायाचित्र )

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाद शिंदे असे दोन गट पडले आहेत. शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हावरून दोघांमध्ये वाद सुरू असताना आता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने ताबा घेतला आहे. यावरून पुन्हा एकदा दोन्ही गटातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा हक्क आहे, असे ते म्हणाले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला त्या महाराष्ट्राची राजकीय अवस्था आज….” राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

संख्याबळावर सर्व गोष्टी अलंबून असतात. कोणतं कार्यालय कोणाला द्यावं हे संख्येवर ठरत असतं. हे आम्ही जाणून बुजून केलेलं नाही. मुंबई पालिकेच्या कार्यालयावर आमचा हक्क आहे. त्यानुसारच आम्हाला ते कार्यालय मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून पोलिसांना मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

मुंबई मनपातील कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला. यावेळी शिंदे गटाकडून खासदार राहूल शेवाळे, नगरसेवक शीतल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव व आदी नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचेही नेते आणि कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्वांनी बाहेर काढले.

हेही वाचा – “…मात्र, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”; राज ठाकरेंचं सुचक विधान

नागपूर विधिमंडळातील कार्यालयावरूनही वाद

दरम्यान, नागपुरात हिवाळी अधिवशन सुरु झाल्यानंतर येथील शिवसेनेच्या कार्यालयाच्या ताबा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात तणाव बघायला मिळाला होता. त्यामुळे हे कार्यालय दोन्ही गटांना विभागून देण्यात आले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 21:31 IST

संबंधित बातम्या