अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथून जवळच असलेल्या टाकळी (छबिले) परिसरात ‘गुरू’ लघुचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. शिक्षक आणि निरागस विद्यार्थ्यांमधील उत्कट भावबंध मांडणाऱ्या लघुचित्रपटात गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिनय साकारला आहे.

हेही वाचा >>> अमरावती : तब्बल २३ चाकूंसह तरुणास अटक ; अवैधरित्या सुरू होती विक्री, गुन्हे शाखेची कारवाई

अक्षरदीप कला अकादमीची प्रस्तुती असलेली ही निर्मिती जागर फाऊंडेशनच्या वतीने प्रा. संतोष हुशे यांनी केली. वाड्या-वस्त्यांवर तळमळीने शिकवणाऱ्या एका शिक्षकाची आणि त्याच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची ही गोष्ट डॉ. महेंद्र बोरकर यांच्या दिग्दर्शनात साकारण्यात आली आहे. लवकरच हा लघुचित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रभात किड्सचा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी सृजन बळी आणि स्कुल आॕफ स्कॉलर्सची इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी पूर्वा प्रमोद बगळेकर तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तथा अभिनेते किशोर बळी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. रमेश थोरात, सचिन गिरी, मेघा बुलबुले, राहुल सुरवाडे, ऐश्वर्या मेहरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : वर्गमित्राकडून विद्यार्थिनी गर्भवती ; बलात्काराचा गुन्हा दाखल

‘गुरू’चे संगीत दिग्दर्शन मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख डॉ. कुणाल इंगळे यांनी केले असून चित्रीकरण तथा संकलन विश्वास साठे यांनी तर रंगभूषा प्रवीण इंगळे यांनी केली. बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांचेसह साधनव्यक्ती गणेश राठोड, केंद्रप्रमुख महेश बावणे, टाकळीच्या सरपंच नंदा चोटमल, शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण छबिले, ‘जागर’चे नंदकिशोर चिपडे, टाकळी (छबिले) ग्रामपंचायत तथा समस्त गावकरी मंडळींचे प्रेरक सहकार्य या कलाकृतीकरिता लाभले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाकळी (छबिले) येथील जिल्हा परिषद शाळेत सदोदित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. कलेच्या प्रांतातील त्यांचे हे पाऊल ग्रामीण भागात तसेच आदिवासी वस्तीत काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि पर्यायाने जिल्हा परिषद शाळांचा गौरव वाढवणारे आहे. – रतनसिंग पवार, गटशिक्षणाधिकारी, पं.स., बार्शीटाकळी.