Nagpur Flood Situation : हिंगणा आणि एमआयडीसी परिसरात पाणी शिरल्यामुळे तेथील पाणी अंबाझरी तलावात आले आहे. शिवाय पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे .
महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोचहचली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. कार्पोरेशन कॉलनी ,कस्तुरबा नगर, डागा ले आऊट, सुभाष नगर येथील पाचशे लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. तीन बोटी घटनास्थळी आले बोटीच्या सहाय्याने लोकांना घराच्या बाहेर काढले जात आहे. शंकर नगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले.मोरभवन परिसरात पाणी शिरले आहे. बसेस अर्ध्या पाण्यांत असून तिथून लोकांना बाहेर काढणे सुरू आहे.
हेही वाचा… नागपुरात मुसळधार पाऊस, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, वस्त्यांमध्ये पाणी
कस्तुरबा नगर आणि डाग आले तेथील अनेक लोक दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील इमारती असलेल्या घरात पोहचले असून काही लोक टेरेसवर उभे आहेत. तलावातील पाणी अजूनही बाहेर येणे सुरू असल्यामुळे डागा ले आउट आणि अंबाझरी येथील लोकांच्या घरातील पार्किंग भरून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले असल्याचे माजी नगरसेविका वर्षा ठाकरे यांनी सांगितले.
शंकर नगर येथील मुकबधीर विद्यालयाच्या परिसरात पाणी शिरल्यामुळे तिथे शंभरपेक्षा अधिक मुले अडकली असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.