बुलढाणा : सध्या अर्थात मे महिन्यात पडणारा दमदार पाऊस मौसमी की वळवाचा हा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर विविध मते मांडण्यात येत आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात चक्क मे महिन्यात पडलेल्या पावसाने एक दमदार विक्रम नोंदविला, असे म्हणता येईल. मागील अनेक वर्षांत पावसाळाव्यतिरिक्त अन्य महिन्यात पडलेल्या पावसाचा हा विक्रमी आकडा हवामान शास्त्रज्ञ, संशोधक यांच्यासाठी एक विषय अथवा आव्हान ठरावा असाच आहे.

बुलढाणा जिल्ह्यात २ मेपासून नियमित अंतराने पावसाने हजेरी लावली. २८ मेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १४३.३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यात देऊळगाव राजा २०६ मिमी आणि सिंदखेड राजा २३८ मिमी या तालुक्यात पावसाने द्विशतक गाठले आहे. जळगाव तालुक्यात १५६ मिमी, चिखली १४३, बुलढाणा १२८, मेहकर १८९, लोणार १९३ मिमी, खामगाव १४६, शेगाव १५५, नांदुरा १११ मिमी या तालुक्यात पावसाने नाबाद शतक केले आहे.

मात्र आज, २८ मे रोजी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील तब्बल ३८ महसूल मंडळांत अतिवृष्टीची अर्थात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जळगाव तालुक्यातील जळगाव, जामोद, पिंपळगाव, आसलगाव, वडशिंगी मंडळात, चिखली तालुक्यातील चिखली, अमडापूर, उदयनगर, पेठ, धोडप, बुलढाणा तालुक्यातील साखळी, देऊळगाव राजा मधील देऊळगाव शहर, देऊळगाव राजा ग्रामीण, तुळजापूर, मेहुणा, अंढेरा मंडळात, मेहकर तालुक्यातील जानेफळ, हिवरा, वरवंड, नायगाव, कल्याना या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यातील उदयनगर मंडळात तब्बल ११२ मिमी पावसाने थैमान घातले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंदखेड राजा तालुक्यातील सिंदखेड, किनगाव, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सोनोशी, शेंदुर्जन, लोणार तालुक्यातील बीबी, सुलतानपूर, हिरडव, अंजनी, खामगाव तालुक्यातील लाखनवाडा, हिवरखेड, अटाळी, पळशी, आडगाव आणि वझर महसूल मंडळंठी अतिवृष्टीने थैमान केले.