लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यातील अनेक भागाला सोमवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले, पण पावसाचा कहर थांबलेला नाही. तर आणखी दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्यातील तापमान गेल्या १५ दिवसात ४५ अंश सेल्सिअस आणि आता ४० ते ४२ अंशादरम्यान असताना बहूतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात गारपिट देखील झाली. सोमवारी नागपूर शहरातही अवघ्या तासाभरात वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. यात शहरातील मोठमोठे वृक्ष, विजेचे खांब कोसळले. तर एमआयडीसी परिसरात चक्क ट्रक पलटी झाले.

हेही वाचा… नागपूर : कर्जबाजारी युवा व्यावसायिकाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी पुण्यात देखील असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. नागपूरच नाही तर मुंबईसह कोकण पट्ट्यावरही आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. तर, राज्याच्या काही भागांवर पावसाळी ढगांचे सावट असेल, पण हा मान्सून नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. हवामानातील हे बदल महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथेही वादळीवाऱ्यासह मूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.