नागपूर: नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी खोलगट भागात साचण्यासह जास्तच पावसाने एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील कोणत्या भागातील फेऱ्या ठप्प झाल्या याबाबत आपण जाणून घेऊ या.
एसटी महामंडळाची मंगळवारी (८ जुलै २०२५ रोजी) संध्याकाळी ६ वाजताची प्रवासी वाहतुकीबाबतची स्थिती पुढे येत आहे. त्यानुसार गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी येथील एसटी बसची वाहतूक बंद आहे. येथे पाल नदी व गाढवी नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. देसाईगंज ते सडकअर्जुनी मार्गावरील प्रमुख राज्यमार्ग ११ तालुका देसाईगंज येथीलही एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहे.
कुरखेडा ते मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ ता. कुरखेडा हा बंद आहे. येथे खोब्रागडी नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. कोरची बोटेकसा ते भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ तालुका कोरची येथील एसटीची बस वाहतूक बंद आहे. येथे भीमपूर नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आहे. कुरखेडा ते वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका कुरखेडा, वैरागड कोरेगाव धानोरा रस्ता राज्यमार्ग ३६८ तालुका आरमोरी, मांगदा ते कलकुली प्रजिमा ५० हा मार्ग, कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता. कुरखेडा (लोकल नाला ) येथीलही एसटी बसची वाहतूक रस्त्यावर पाणी असल्याने बंद आहे.
चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी, गोठनगडी ते चांदागड सोनसरी रस्ता प्रजिमा ३८ तालुका- कुरखेडा, कुरखेडा ते तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा ४६ तालुका कुरखेडा येथीलही एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहे. सती नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने आंधळी ते नैनपुर रस्ता प्रजिमा ३२, शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज, आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा ४९ तालुका देसाईगंज, मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा ४ तालुका कुरखेडा, वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा ८ तालुका आरमोरी, चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 5५३ तालुका चामोर्शी, सावरगाव ते कोटगुल रस्ता प्रजिमा ३ तालुका कोरची, अरसोडा ते कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज येथीलही एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प पडली आहे.