गोंदिया : अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आज, ११ जुलैपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस हेल्मेट न वापरणाऱ्यांचे समुपदेशन केले जाणार असून त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे, हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे.

हेही वाचा – रस्ते वाहतूकमंत्री गडकरी म्हणतात, “मै तो चला, जिधर चले रस्ता” वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यापारी व शहरवासियांना हेल्मेटसक्तीतून मुभा द्यावी, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दुचाकी चालवताना चालकांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. केवळ कारवाई करणे हा आमचा उद्देश नसून दुचाकीचालकांची सुरक्षा हा मुख्य उद्देश आहे. दुचाकीचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.