यवतमाळ : पांढरकवडा येथील पारवा रोडवरील संतोषी मंदिरालगत एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्याचे घबाड पोलिसांच्या हाती लागले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथे केलेल्या कारवाईत २२ प्रतिष्ठीत नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १८ लाख ११ हजार ५०० रुपयांची रोकड, मोबाइल, कार असा एकूण ५८ लाख ४४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पांढरकवडा येथे खळबळ उडाली आहे.

या कारवाईत गब्बर मोतेखा पठाण (रा. रामनगर, यवतमाळ), रणजित फुलसिंग चव्हाण (रा. पांढरकवडा), ईश्‍वर सुधाकर ठाकरे (रा.राजुरा, जि. चंद्रपूर), आदिल हुसेन पोसवाल (रा. पांढरकवडा), शालेंद्र भाउराव चव्हाण (रा. कोरपना, जि. चंद्रपूर) , आवेज शकील अन्सारी (रा. राजुरा), शुभम अशोक राय (रा.पांढरकवडा), मोहम्मद मक्सुद मोहम्मद मन्सूर पारेख (रा. कोरपना), सय्यद जिब्राईल सय्यद इब्राहीम (रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर), सचिन केशव मुद्दलवार (रा. पांढरकवडा), प्रियम अशोक राय (रा. पांढरकवडा), सिनू राजू झुपाका (रा. राजुरा), मिथून छगन चावरे (रा. पांढरकवडा), शेख आसीफ शेख चांद (रा. पारवा), साहील शफाक शेख (रा. राजुरा), शकिल शेख चांद (रा. पारवा), प्रमोद उत्तमराव भोयर (रा. केळापूर), आकाश किशोर बोरेले (रा. पांढरकवडा), आकाश पृथ्वीराज तिवारी (रा.यवतमाळ), गणेश पांडुंरंग आस्वाले (रा.वसंतनगर घाटंजी), आशीष धिरज बहुरीया (रा.बल्लारशा), हाफीजूर रहेमान खलीलूर रहेमान (रा. विराणी टॉकीज, वणी), अशी प्रतिष्ठीत म्हणून मिरविणार्‍या जुगारींची नावे आहेत. घरमालक उदय नवाडे हा फरार झाला.

हेही वाचा >>> अकोला दंगल प्रकरणातील मुस्लीम आरोपींना आंतरधर्मीय जामीनदार आणण्याची सूचना; पोलीस अधीक्षकांनी आरोप फेटाळले

जुगारप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या अड्ड्यावर यवतमाळ, चंद्रपूर, बल्लारशहा, राजुरासह पांढरकवडा येथील प्रतिष्ठीत जुगारी खेळण्यासाठी येत होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक राहुल गुहे, बंडू डांगे, सय्यद साजिद, अजय डोळे, रूपेश पाली, विनोद राठोड, नीलेश राठोड, रितूराज मेडवे, धनंजय श्रीरामे, अमित कुमरे आदींनी केली. या हायप्रोफाइल जुगार अड्ड्याबाबत पांढरकवडा पोलिसांना माहिती नसावी, याबद्दल खुद्द पोलीस दलातूनच आश्‍चर्य व्यक्त होत आहे.