नागपूर: महावितरणच्या शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्ही सुविधांचा वापर केल्यास त्याला दरमहा किमान वीस रुपये, असे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळणे शक्य आहे, असा दावा महावितरणने केला आहे. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीज देयक भरल्यास त्यांना तत्पर देयक भरल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम, बँकेचे ॲप किंवा महावितरणच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भरल्यास ग्राहकांना ०.२५ टक्के सवलत मिळते.

सोबत ग्राहकांनी छापील कागदी देयकाएवजी ईमेलने देयक स्वीकारण्याचा ‘गो ग्रीन’चा पर्याय निवडल्यास प्रत्येक देयकात दहा रुपये सवलत मिळते. त्यामुळे शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला तर दरमहा किमान वीस रुपये म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळणे शक्य असल्याचे महावितरणचे म्हणने आहे.

हेही वाचा >>> चंद्रयान-३ मोहिमेत खामगावचाही महत्त्वाचा वाटा; यानात दोन उद्योगांच्या थर्मल शील्ड व सिल्व्हर स्टलींग ट्यूबचा वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दोनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने या तीनही सुविधा घेतल्यास दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपये, तीनशे युनिट मासिक वीज वापर असणाऱ्याने या सोयी घेतल्यास दरमहा ५१ रुपये म्हणजे वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळणे शक्य असल्याचे महावितरणच्या नागपूर प्रादेशिक मंडळाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचे म्हणने आहे. त्यामुळे ग्राहकांनी या पर्यावरन पुरक सोयींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.