अमरावती : येथील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या फळ आणि भाजीपाला बाजारात होणाऱ्या लिलावात चांगल्‍या प्रतीच्‍या काद्याला ४ हजार ५०० रुपये क्विंटलचे दर मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात हाच कांदा ७० ते ७५ रुपये किलोने विक्री होतो. बाजार समितीतील लिलाव स्‍थळ ते इतवारा येथील भाजीबाजार या फक्‍त एक किलोमीटर अंतरात कांद्याचे दर एका किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढतात. हलक्‍या व दुय्यम प्रतीच्‍या कांद्याला लिलावात २ हजार ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतात. बाजारात या कांद्याची विक्री ४५ ते ५० रुपये किलोने होते.

कांद्याच्या दराने सध्या ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. विशेष म्हणजे या वाढीव दराचा शेतकऱ्यांना काडीचासुद्धा फायदा होत नाही. गेल्‍या काही दिवसांत कांद्याच्‍या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी घट झाली असली, तरी ग्राहकांना त्‍याचा फारसा फायदा झालेला नाही. केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डॉलर प्रती टन केले आहे. तसेच बफर स्टॉकमधून कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यामुळे दरात घसरण होण्याची शक्यता आहे. पण, बफर स्टॉक आधी मोठ्या शहरांमध्ये येईल. नंतर तो लहान शहरांत दाखल होईल. त्यामुळे अजून आठवडाभर कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यापासून

हेही वाचा – नागपूर : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले, आजचे दर पहा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजार समितीत सध्‍या कांद्याची आवक कमी प्रमाणात असून केवळ १५० ते २५० क्विंटल दररोज आवक होत आहे. पाढऱ्या कांद्याची किंमत जास्‍त आहे. सध्‍या बाजारात लाल कांद्याची आवक अधिक आहे.